भुसावळ (प्रतिनिधी )-

मांडवेदिगर जवळील पावरा पाड्यावर क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती देवगिरी कल्याण आश्रम च्या भुसावळ जिल्ह्याकडून १५ रोजी साजरी करण्यात आली
जनजाती समाजाचे क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस दरवर्षी देवगिरी कल्याण आश्रम च्या वतीने साजरा केला यावेळी हा जन्मोत्सव पावरी वस्तीवर दिवाळी चा फराळ वाटप करून साजरा केला. यावेळी वस्तीचे प्रमुख नरसिंग नांद्रया पावरा व देवगिरी कल्याण आश्रम च्या भुसावळ जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ निलेश भिरुड यांचे हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. सचिव काशिनाथ बारेला यांनी भगवान बिरसा मुंडा यांचे जीवनचरित्र वस्तीवरील लोकांपुढे मांडले व युवा पिढीला त्यांच्या बलिदानाची आठवण करून दिली.
तसेच महिला जिल्हा उपप्रमुख ॲड जास्वंदी भंडारी यांनी वस्तीवरील षुरुष व महिलांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची हमी दिली.
वस्तीवरील सर्व झोपड्यांना दिवाळी फराळ वाटप केले या कार्यक्रमाला अध्यक्ष डॉ निलेश भिरुड, श्री. मधुकर वाणी सर, ॲड जास्वंदी भंडारी, ॲड. जयश्री देशमुख , काशिनाथ बारेला ,विरसिंग वसावे प्रणव नागराज , यश नेवे, गावप्रमुख श्री देवाजी कांद्या बारेला , व सर्व वस्तीवरील महिला पुरुष उपस्थित होते.


