भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील खडका रोड, रजा टॉवर भागातील मोबाईल दुकान फोडून त्यातील मोबाईल चार्जर, पॉवर बँक, ब्लू टूथ, स्पीकर आदी ५९ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची घटना १ जुलै रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीवरून फिरोज शेख अकील गवळी रा .जाम मोहल्ला, भुसावळ यास अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यास बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीकडून आणखी काही घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता आहे.
जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शरीफ काझी, युनूस शेख, किशोर राठोड, विनोद पाटील, रणजीत जाधव, मुरलीधर बारी यांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.



