भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील औष्णिक वीज निर्मिती केंद्र दीपनगर येथे सार्वजनिक महर्षी वाल्मिकी उत्सव समितीच्या वतीने महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी मुख्य अभियंता राजेश मोराडे यांच्या हस्ते राममंदिर येथे महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

कामगार वसाहतीतून महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेची घोडागाडी मधुन सुवाद्यात मिरवणूक काढण्यात आले.मिरवणूकीत कामगार अधिकारी आणि महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सचिव तुषार सुर्यवंशी, सहसचिव किरण तायडे,वाल्मिक तायडे, कोषाध्यक्ष बादल तायडे, सह कोषाध्यक्ष नरेंद्र सपकाळे , प्रविण तायडे, समाधान सपकाळे, हिशोब तपासणी दिनकर सपकाळे,दिपक तायडे, अशोक करांडे ,विजय कोळी ,रवी तायडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
