कोल्हे फॉर्म हाऊस प्रकरणात मोठी अपडेट, ‘मास्टरमाईंड’च्या… –

जळगाव (प्रतिनिधी ) – विदेशातील नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या जळगावातील बोगस कॉल सेंटरप्रकरणात विदेशातीलही कोणी साथीदार सहभागी होते का?, या दृष्टीने तपास केला मास्टरमाईंडसोबत त्यांचा संपर्क कसा आला, याचाही शोध घेतला जात आहे. जात आहे.

याप्रकरणी जागा मालक ललित कोल्हे यांच्या मोबाईलवरून किती कॉल झाले, लॅपटॉपमधील इतर माहिती पोलिसांनी संकलित केली. या सोबतच फसवणुकीची रक्कम किती आहे, ती कोणत्या खात्यावर स्वीकारली गेली, कोणाच्या खात्यावर किती रक्कम आली याचाही तपास केला जात आहे.

वरिष्ठांचे राजकीय व प्रशासकीय पाठबळ
बोगस कॉल सेंटर सुरू करण्यासाठी सुरक्षित जागेसह राजकीय वरदहस्त या दोन्ही बाबी जळगावात उपलब्ध झाल्या. केवळ स्थानिक राजकीय पाठबळावर हे शक्य नसल्याने जागा मालकाच्या मुंबईतही अनेक वेळा फेऱ्या झाल्या.

यातील मास्टरमाईंड अकबर व अन्य चौघांसोबत बैठक होण्यासह राजकीय पातळीवरही गुफ्तगू झाली. विशेष म्हणजे मुंबईतही असे केंद्र या पूर्वी आढळले होते व तेदेखील एका राजकीय पक्षाशी निगडीत व्यक्तीचे होते.

अशा प्रकारे राजकीय पाठबळ मिळविण्यासह वरिष्ट अधिकाऱ्यांशिवायदेखील केंद्र चालविणे शक्य नव्हते. त्यामुळे या पूर्वी जळगावात सेवा बजावलेल्या व आता वरिष्ट पदावर असलेल्या अधिकाऱ्यांचीही यात मदत झाल्याची जोरदार चर्चा आहे. राजकीय व प्रशासकीय पाठबळामुळे या केंद्राला सुरुवात होऊ शकली, असेही सांगितले जात आहे.