भुसावळ (प्रतिनिधी ) : भुसावळ विभागातील जळगाव-मनमाड विभागात तिसरी व चौथी रेल्वे लाईन तसेच लाँग हॉल लूप लाईनच्या अनुषंगाने नांदगाव स्थानक व यार्डमध्ये यार्ड रीमॉडेलिंग आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे कमिशनिंग करण्यात येत आहे. यासाठी प्रि-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन इंटरलॉकिंग कामे हाती घेण्यात आल्याने विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येत आहे.

7 रोजी या गाड्या रद्द
गाडी क्रमांक 11113 देवळाली-भुसावळ एक्सप्रेस तसेच गाडी क्रमांक 11114 भुसावळ-देवळाली एक्सप्रेस व गाडी क्रमांक 11119 इगतपुरी-भुसावळ मेमू व गाडी क्रमांक 11120 भुसावळ-इगतपुरी मेमू 7 रोजी रद्द करण्यात आली आहे.
8 रोजी या गाड्या रद्द
गाडी क्रमांक 11113 देवळाली-भुसावळ एक्सप्रेस व गाडी क्रमांक 11114 भुसावळ-देवळाली एक्सप्रेस तसेच गाडी क्रमांक 11119 इगतपुरी-भुसावळ मेमू तसेच गाडी क्रमांक 11120 भुसावळ-इगतपुरी मेमू रद्द असेल.
9 रोजी या गाड्या रद्द
गाडी क्रमांक 11113 देवळाली-भुसावळ एक्सप्रेस व गाडी क्रमांक 11114 भुसावळ-देवळाली एक्सप्रेस तसेच गाडी क्रमांक 11119 इगतपुरी-भुसावळ मेमू तसेच गाडी क्रमांक 11120 भुसावळ-इगतपुरी मेमू रद्द असेल.
9 रोजी या गाड्या उशिराने धावणार
गाडी क्रमांक 12171 लोकमान्य टिळक टर्मिनस-हरिद्वार एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 7.55 वाजता सुटण्याऐवजी 10.25 वाजता (02.30 तास उशिराने) सुटेल. गाडी क्रमांक 22312 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोड्डा एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 08.05 वाजता सुटण्याऐवजी 10.05 वाजता (02 तास उशिराने) सुटेल. गाडी क्रमांक 12534 मुंबई -लखनऊ एक्सप्रेस मुंबई येथून 08.25 वाजता सुटण्याऐवजी 10.25 वाजता (दोन तास उशिराने) सुटेल.
