कवी “निर्मोही” यांनी विणला साहित्य गोफ : एकाच वेळी एकदम सोळा पुस्तकांचं प्रकाशन ; दिनांक ५ ऑक्टोबर २५ ला आत्मीय मैफल चा साहित्य सृजन सोहळा ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ येथील कवी काशिनाथ भारंबे ” निर्मोही ” यांनी वयाची ऐंशी गाठली आहे , तरी अजूनही त्यांचा जोम कायम आहे , दिनांक ५ ऑक्टोबर ला त्यांच्या १६ पुस्तकांचं प्रकाशन होऊ घातले आहे , सोबत आजवरच्या त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल त्यांच्या साहित्यिक मित्रमंडळींनी प्रकट केलेल्या भावभावनांच्या लेखांचा एक विशेषांक ही खडका रोड तळेले काॅलनी येथील मैफल घ्या सभागृहात सकाळी दहा वाजता प्रकाशनाचा कार्यक्रम होणार आहे ,
भुसावळातच नाही तर आपल्या खांदेशात एकाच लेखकाची एकदम १६ पुस्तकं प्रकाशित होण्याचा हा पहिलाच कार्यक्रम आहे असे वाटते ,
सदर कार्यक्रमासाठी तर , संभाजी नगर येथील सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संपतराव शिंदे पाटील हे अध्यक्षस्थानी असतील सोबत आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त चित्रकार श्री श्रीधर अंभोरे , कवी गझलकार श्री शिवाजी जवरे , शिक्षण उपसंचालक श्री शशिकांत हिंगोणेकर , परभणीचे हायकूकार , बॅंक अधिकारी तुकाराम खिल्लारे , बालभारती चे सदस्य प्रा डॉ जगदीश पाटील सर , मुंबई येथील हे नि वैद्यकीय अधिकारी हायकुकार डॉ शशिकांत गंगावणे , बुरहानपुर (म प्र) येथील हिंदी कथाकार कवी श्री संतोष परिहार , डॉ मधुकर खराटे , सिल्लोड येथील सिने गीतकार – कवी श्री धनंजय गव्हाले आणि धुळे येथील लेखाधिकारी कवी लेखक श्री संजय जाधव , आणि छ संभाजी नगर येथील नर्मदा सिने व्हिजन च्या सर्वेसर्वा मानिनी मासिकाच्या संपादिका डॉ सुनिता शिंदे पाटील यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होणार असून यांसोबतच राज्यभरातून अनेक मान्यवर साहित्यिकही येऊन त्यांचे विचार मांडणार आहेत , त्यात आपल्याही उपस्थितीसाठी आवाहन करण्यात येत आहे
कवी “निर्मोही” भारंबे यांचे चौफेर लेखन,

कवी भारंबे “निर्मोही” यांनी आजपर्यंत अडीच शे ते तीन शे नवोदितांचे साहित्य प्रकाशित करुन त्यांसाठी साहित्याचे दालन खुले करुन दिले आहे , त्यात भारंबे याचेही कथा संग्रह , कवितासंग्रह , जपानी काव्य प्रकार , हायकू संग्रह, तांका संग्रह , गझल , ललित लेखन , इ नाही समावेश आहे , १९९० मध्ये मैफल ग्रुप स्थापन करुन आणि मैफल प्रकाशन सुरू करुन साहित्यिक वातावरण तयार केले आहे , ते स्वखर्चाने दरवर्षी कवी संमेलन , चर्चा सत्र आयोजित करायचे , त्यांनी सर्व प्रकारात लेखन केले आहे , आज ते ८० वर्ष वयाचे झाले आहेत तरीही ते साहित्यिक योगदासाठी तत्पर असतात ,