नाहाटा महाविद्यालयात फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे”लो कॉस्ट रोबोटिक्स with Arduino” वर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न –


भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथील फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे “Low Cost Robotics with Arduino” वर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली .या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून श्री राजेश ठाकरे (COE इलेक्रोसॉफ्ट सिस्टिमस जळगाव) उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन भाऊ फालक हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन श्री. महेशभाऊ फालक, संस्थेचे सेक्रेटरी श्री. विष्णू भाऊ चौधरी, संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. संजयकुमारजी नाहाटा, प्राचार्य प्रा. डॉ.बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रा. डॉ. जी. आर. वाणी, उपप्राचार्य प्रा. डॉ. डी. एन. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. वाय. एम. पाटील, फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख प्रा.डॉ.चंद्रकांत सरोदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री राजेश ठाकरे म्हणाले की, और्डीनो द्वारे आपण वेगवेगळ्या मशीन, वस्तू तसेच शिक्षणासाठी लागणारे प्रत्यक्षिके हे नियंत्रित करू शकतो. विद्यार्थ्यांना जर और्डीनो चे योग्य ज्ञान अवगत झाले तर ते कृषी, आरोग्य आणि घरगुती सेवा या क्षेत्रात विशेष प्रगती करू शकतात. नंतर त्यांनी रोबोट्स चे मॉडेल दाखवले व त्यांनी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरची इंटरफेसिन्ग करून दाखवली आणि रोबोटिक्स च्या काही मॉडेलचे प्रत्यक्षिक दाखवले व विद्यार्थांकडून करून घेतले. प्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे म्हणाले की और्डीनो बोर्ड हे तुलनेने स्वस्त असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या बजेटशिवाय रोबोटिक्स उपलब्ध होऊ शकतात शिवाय ते वापरण्यास सोपे आहे आणि यामुळे ऑटोमॅशन सिस्टिम जलद होते. काही जण तंत्रज्ञानातील हार्डवेअरचा अभ्यास करतात तर काही जण सॉफ्टवेअर चा अभ्यास करतात मात्र और्डीनो आणि रोबोटिक्स हे दोन्ही क्षेत्रांना जोडणारे दुवे आहेत.

अध्यक्षीय भाषणात डॉ मोहनभाऊ फालक म्हणाले की, फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयांमध्ये संशोधन हे झपाट्याने होत आहे प्रत्येक शोध हा नावीन्यपूर्ण आणि समाजासाठी अत्यन्त उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा व आपला अभ्यास बहुआयामी ठेवावा जेणेकरून त्यांना विविध संधी उपलब्ध होऊन त्यांचं भविष्य उज्वल होईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ.चंद्रकांत सरोदे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विरल वाणी यांनी केले, तर आभार प्रा. कृतिका पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. कोमल सरोदे, प्रा. वैभव पाटील, प्रा. जयेश पाटील, श्री. प्रवीण सपकाळे, श्री अमोल महाजन, श्री पी. डी. पाटील, श्री शशिकांत बाविस्कर, श्री गोकुळ चौधरी, श्री नंदू पाटील, श्री महेंद्र चौधरी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुसंख्य उपस्थित होते.

फोटो ओळ – फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विभाग आयोजित “Low Cost Robotics with Arduino” या एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेप्रसंगी बोलतांना ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन भाऊ फालक, चेअरमन श्री. महेशभाऊ फालक, सेक्रेटरी श्री. विष्णूभाऊ चौधरी, कोषाध्यक्ष श्री. संजयकुमारजी नाहाटा, प्राचार्य डॉ.बी. एच. बऱ्हाटे व इतर मान्यवर