भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील नाहाटा महाविद्यालयात विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी दि. ३० व १ ऑक्टोंबर रोजी करण्यात आली.यावेळी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या प्रथम वर्ष बीए,बीकॉम,बीएससी व बीसीए तसेच एम ए, एम कॉम,एम एससी, एम सी ए या विभागात शिक्षण घेणाऱ्या अशा एकूण ८४७ विद्यार्थी व विद्यार्थीनींची तपासणी करण्यात आली.यावेळी शहरातील प्रतिष्ठित डॉ.वीरेंद्र झांबरे,डॉ चैताली झांबरे,डॉ.धैर्यसागर राणे,डॉ.राहूल सिंग, डॉ.अभय जावळे,डॉ.एस एम पाटील,डॉ.केतन महाजन,डॉ.विद्याधर भोळे यांनी तपासणी केली तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बि एच बऱ्हाटे,उपप्राचार्य दिपक पाटील,डॉ.जी आर वाणी,प्रा सचिन येवले,सचिन कोलते,पी एच इंगोले,एम एन पाटील,गौतम भालेराव,स्वाती फालक,पूनम महाजन, दिनानाथ पाठक,भगवान तायडे आदी उपस्थित होते.

फोटो – भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी प्रसंगी उपस्थित प्राचार्य डॉ.बी एच बऱ्हाटे,उपप्राचार्य दिपक पाटील ,डॉ वीरेंद्र झांबरे, डॉ.चैताली झांबरे,डॉ.धैर्यसागर राणे,डॉ. केतन महाजन,डॉ.राहूल सिंग आदी.
