अ.भा. जैन अल्पसंख्यांक महासंघावर महाराष्ट्रसह सचिवपदी भुसावळातील चेतन जैन यांची निवड

भुसावळ (प्रतिनिधी ) – मुंबई येथे अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्या झालेल्या मुख्य बैठकीत महाराष्ट्र प्रदेश सह सचिव पदी चेतन जैन यांच्या निवडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

जैन समाजाची राष्ट्रीय शिखर संस्था असलेल्या अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघ (AIJMF) चा मुंबई येथे शपथविधी समारंभामध्ये भुसावळचे सामाजिक कार्यकर्ते चेतन जैन यांना महाराष्ट्र प्रदेश सह सचिव पदी निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी देशाच्या विविध ठिकाणाहून आलेले जैन समाजाचे अनेक मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

AIJMF चे लक्ष समस्त सकल जैन संघटनांशी समन्वयक साधून जैन समाजाचे ऐक्य व संरक्षण करणे, केंद्र व राज्य सरकारच्या समाजातील अल्पसंख्यांक योजना समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवणे, जैन तीर्थक्षेत्र व जैन धर्मस्थळे सुरक्षा व संवर्धन करणे, मुनी संत साध्वी यांच्या विहार व्यवस्था इ. समितीच्या माध्यमातून महासंघाने दिलेली जबाबदारी पार पडतील,असा विश्वास AIJMF चे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केला आहे.

आतापर्यंत चेतन जैन यांनी समाज हितासाठी केलेल्या कार्य, तरुण व तडफदार युवा नेतृत्व असून, राजकीय,सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या अविस्मरणीय कार्याची वाटचाल यापुढेही जोरात चालू राहील,अशी अपेक्षा जैन महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी यांनी व्यक्त केली.

समाजाने दिलेली ही जबाबदारी मी निष्ठा प्रामाणिकपणा व सामाजिक जाणीव जोपासून, आपल्या पदाला न्याय देत सकल जैन समाजाच्या प्रगतीसाठी व सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार असे मनोगत चेतन जैन यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमात राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, राज्यमंत्री ललित गांधी, संदीप भंडारी,विकास अच्छा,वीरेंद्र संकलेचा व जैन समाज बांधव मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.