भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील नाहाटा महाविद्यालयात प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान शिक्षण मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्या सौजन्याने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्तरीय एक दिवसीय विद्यार्थी विद्यार्थिनींचे उद्बोबोधन कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेच्या प्रथम सत्रात उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी कार्यशाळेचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.बी एच बऱ्हाटे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रा.डॉ. जी आर वाणी, भुसावळच्या सुप्रसिद्ध समुपदेशक सौ.आरती चौधरी,कार्यशाळा समन्वयक उपप्राचार्य प्रा.डॉ.दीपक पाटील,IQAC समितीचे सर्व सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी सुरुवातीला दीप प्रज्वलन व सरस्वतीच्या मातेला पुष्पहार अर्पण करून कार्यशाळेचे उद्घाटन उद्घाटक प्राचार्य डॉ. बी.एच. बऱ्हाटे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी कार्यशाळा समन्वयक उपप्राचार्य प्रा.दीपक पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात या कार्यशाळेची संपूर्ण संकल्पना स्पष्ट केली.ही कार्यशाळा प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा विभाग तसेच शिक्षण मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने आपल्या महाविद्यालयास मिळाल्याबद्दल त्यांनी पीएम उषा आणि भारत सरकारचे महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त केले तसेच या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःचे समुपदेशन करावे आणि समुपदेशन झाल्यानंतर त्याचा उपयोग समाजात करावा अशा पद्धतीचे प्रास्ताविक सादर केले. प्रमुख पाहुणे उपप्राचार्य डॉ जी आर वाणी यांनी आपल्या आयुष्यात वेगवेगळे स्ट्रेस कसे असतात त्या सर्व स्ट्रेसचे निरूपण कसं करावं, करिअरचे प्रेशर असताना आपण आपल्या स्वतःचंच समुपदेशन कसं करावं समुपदेशन म्हणजे सल्ला नाही तर समुपदेशन ही एक आपण आपल्याला लावून घेतलेली सवय आहे.तसेच समुपदेशन घेणे ही एक कमजोरी नसून मजबूत रस्ता आहे असे मनोगत केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि कार्यशाळेचे उद्घाटक प्राचार्य डॉ.बी एच बऱ्हाटे यांनी अति उपयुक्त असे समुपदेशन आजच्या पिढीला आवश्यक आहे आणि तेच देण्याचा प्रयत्न महाविद्यालया मार्फत होत असतो तसेच तुम्ही सर्व विद्यार्थी ज्या वयात जगत आहे त्या वयात समुदेशन कमी असतं ते समुपदेशन अशा प्रकारच्या कार्यक्रमातून आपण आत्मसात करावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा जेणेकरून आपल्याला कोणत्याही गोष्टीची काम करत असताना अडचण येणार नाही,अशा पद्धतीचे मार्मिक व उदबोधनपर असे मार्गदर्शन केले
.यानंतर दुसऱ्या सत्रात भुसावळच्या सुप्रसिद्ध समुपदेशक सौ. आरती चौधरी यांनी विवाहपूर्व समुपदेशन या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की यशस्वी वैवाहिक जीवनाची पहिली पायरी हे कौटुंबिक आयुष्य यशस्वी असणे ही आहे, तसेच कुटुंब संस्थेसाठी विवाहपूर्व समुपदेशन आवश्यक आहे कारण विवाहपूर्व समुपदेशन झाल्याने कुटुंबातली पत्नी किंवा पती यांच्यामध्ये सकारात्मक संबंध प्रस्थापित होण्यास मदत होते व त्यामुळे कुटुंब संस्था ही चांगल्या पद्धतीने बहरू शकते,त्याचप्रमाणे विवाहपूर्व समुपदेशन करताना त्यांनी परस्पर संवाद सुधारणे,जबाबदारी समजून घेणे, घटस्फोटाला प्रतिबंध लावणे, हुंडापद्धत बंद करणे,अशा वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकला. कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रात नाहाटा महाविद्यालयातील डॉ.मनोजकुमार जाधव यांनी युवकांचे मानसशास्त्रीय समुपदेशन या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की युवा म्हणजे काय,युवा अवस्था आणि युवा अवस्थेत येणाऱ्या वेगवेगळे मानसिक, सामाजिक, शारीरिक, भावनिक स्वास्थ्य कसे टिकवावे. मानसिक स्वास्थ्य हे आपणास परिवारातून, उपस्थितीतून वातावरणातील असंख्य गोष्टीवर आधारित असल्याने आपण आपल्या मानसिक स्वास्थ्यावर कोणत्याही नकारात्मक गोष्टींचा प्रभाव न होऊ देता सकारात्मक गोष्टी वापरून आपले मानसिक स्वास्थ्य चांगले राखावे. नैसर्गिक आपत्ती, हिंसा,गरिबी या सर्व गोष्टी जर युवा अवस्थेमध्ये मानसिक समुपदेशन व्यवस्थित नसले तर घडू शकतात म्हणून मानसिक समुपदेशन ही काळाची गरज आहे याशिवाय मानसिक रोग कसे असतात,मानसिक रोगाची लक्षणे काय काय आहेत, झोप न येणे, स्वतःची काळजी न घेणे,अस्वस्थ वाटणे,आवाज ऐकू येणे हे सर्व आरोग्याशी निगडित समस्या आहे त्या समस्यांवर आपण मानसिक समुपदेशन केल्याने कसा परिणाम होतो तो परिणाम कसा सकारात्मक होतो याविषयीचा ओहापोहो केला कार्यशाळेच्या चौथ्या सत्रात मुळजी जेठा महाविद्यालयातील डॉक्टर पंडित चव्हाण यांनी करिअर समुपदेशन याविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की यशस्वी करिअर घडवण्यासाठी व्यावहारिक कौशल्य जशी आवश्यक असतात तशी आत्मिक कौशल्य देखील आवश्यक आहे आत्मिक कौशल्य आणि व्यावहारिक कौशल्य यांची सांगड घालून आपण यशस्वी करिअर आपापल्या क्षेत्रामध्ये करू शकतो संज्ञापन संवाद कौशल्य भावनिक बौद्धिकता परिस्थितीशी जुळवून घेणे बदल सामावून घेणे समूह कार्य चिकित्सक चिकित्सक विचार करणे नेतृत्व कौशल्य वृद्धिंगत करणे वेळ व्यवस्थापन करणे स्वतःचे व्यवस्थापन करणे डिजिटल साक्षरता सतत शिकत राहणं हा मूलमंत्र देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना अतिशय मार्मिक भाषेत उद्बोधन केले
पाचव्या सत्रामध्ये भुसावळ येथील सुप्रसिद्ध डॉक्टर सुवर्णा गाडेकर यांनी आरोग्य व स्वच्छतेवर स्वच्छता स्वच्छता समोर पोझिशन या विषयावर मार्गदर्शन केले आपण आपलं व्यवस्थापन करत असताना किंवा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करत असताना कोणता आहार घ्यावा आहार आणि आपलं व्यक्तिमत्व याचा कसा संबंध आहे त्याचप्रमाणे व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर आपण सकस व निरोगी असा आहार घेतला पाहिजे याविषयीचे मार्गदर्शन केलं आपल्या मार्गदर्शनात त्यांनी आहारात घेत असताना जास्तीत जास्त फल फलावडे खाऊन आपण आपली दिनाच्या रिया करावी अन्न हे फार कमी प्रमाणात घ्याव याविषयीचं मार्मिक उद्बोधन केले या कार्यशाळेच्या समारोपीय सत्रात समारोपकर्ते म्हणून उपप्राचार्य डॉ.जी आर वाणी,तर प्रमुख पाहुणे म्हणून कार्यशाळेचे समन्वयक उपप्राचार्य डॉ. दीपक पाटील हे उपस्थित होते. यावेळी या कार्यशाळेचे फलित काय झालं विद्यार्थ्यांनी त्यातून काय आत्मसात केलं व काय आत्मसात करायला पाहिजे याविषयीचा ओहापोहो डॉ.जी.आर.वाणी यांनी केला या संपूर्ण कार्यशाळेसाठी भुसावळ परिसरातील सुमारे 225 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.या संपूर्ण कार्यशाळेचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.चंद्रकांत सरोदे यांनी केले,तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी IQAC समितीचे सभासद प्रा.डॉ. गौरी पाटील,प्रा. डॉ.आनंद उपाध्याय, प्रा.डॉ.ममता पाटील,प्रा.डॉ. सचिन येवले, प्रा.डॉ.मनोजकुमार जाधव,प्रा.डॉ.उमेश फेगडे,प्रा.हर्षल पाटील, प्रा.डॉ. प्रफुल्ल इंगोले, प्रा. प्रशांत पाटील, प्रा.भूषण चौधरी, प्रा.डॉ.मनोज पाटील,प्रा.डॉ. राजेंद्र तायडे, प्रा.डॉ.दिनानाथ पाठक यांनी परिश्रम घेतले
फोटो कॅप्शन कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉक्टर बी एच बऱ्हाटे,सोबत डावीकडून कार्यशाळा समन्वयक उपप्राचार्य प्रा.डॉ.दीपक पाटील,सौ आरती चौधरी,उपप्राचार्य प्रा.डॉ.जी आर वाणी आदी

