नाहाटा महाविद्यालयाचे एकदिवसीय रासेयो शिबिर दत्तक गाव किन्ही येथे संपन्न



भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एकका द्वारे दत्तक गाव किन्ही येथे स्वच्छता ही सेवा आणि एक पेड मा के नाम या उपक्रमाअंतर्गत एक दिवशीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. गावाचे सरपंच सौ. नीलम सोनवणे यांनी विद्यार्थ्यांच्या रॅलीस हिरवा झेंडा दाखवून शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. शिबिरा दरम्यान सर्वोदय हायस्कूल येथे एक पेड मा के नाम उपक्रम अंतर्गत मुख्याध्यापक श्री. एम. एम. चौधरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यानी शाळेच्या परिसरात प्लास्टिक आणि कचरा संकलन करून श्रमदान केले. तसेच गावात आणि शाळेत पथनाट्याच्या माध्यमातून स स्वच्छता ही सेवा आणि अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरती सामाजिक प्रबोधन केले. दुपारच्या सत्रात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात प्रमुख पाहुणे म्हणून रासेयो सल्लागार समिती सदस्य श्री. राजेश सुरवाडे उपस्थित होते. प्रमुख वक्ते श्री. प्रफुल्ल वाघमारे यांनी स्वच्छता ही सेवा या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच श्री. राजेश सुरवाडे यांनी एन.एस.एस. स्थापना आणि रासेयो हिवाळी शिबिर बाबत विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. महाविद्यालयीन जीवनात एन.एस.एस. मुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि नेतृत्वकौशल्य गुण विकसित होण्यास मदत होते तसेच विद्यार्थी सामाजिकदृष्ट्या सुज्ञान होतात असे प्रतिपादन कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास महिरे यांनी केले

. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी पाटील आणि आरती पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. साहेबराव राठोड यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास महिरे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. साहेबराव राठोड, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. संगीता भिरूड आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ. डी. एन.पाटील, उपप्राचार्य डॉ. जी. आर. वाणी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.