भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील नामांकित नाहाटा महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे ” एआय फॉर बिजनेस ” विषयावर 23 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2025 दरम्यान तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. आज सर्वच व्यवसायामध्ये AI चा वापर होत आहे. या AI चा व्यवसाय प्रगतीकरणासाठी कसा उपयोग केला जाऊ शकतो याविषयी विविध ज्ञानवंत व्याख्यात्यांचे मार्गदर्शन सुमारे 200 सहभागी विद्यार्थ्यांना प्राप्त झाले.
कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय प्रोफेसर बी एच बऱ्हाटे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रोफेसर डॉ. जी आर वाणी, डेटा सायन्स विभाग प्रमुख डॉ गौरी पाटील, YCMOU समन्वयक डॉ. स्वाती फालक, एमसीए समन्वयक प्रा हर्षल पाटील आणि पूनम महाजन उपस्थित होते. द्वितीय सत्रामध्ये डॉ गौरी पाटील यांनी विद्यार्थ्यांना “Introduction to AI” या विषयावर मार्गदर्शन केले.

वर्कशॉप च्या दुसऱ्या दिवशी डॉ. जी आर वाणी यांनी “Basics of Machine Learning” या विषयावर विद्यार्थ्यांना समुपदेशित केले.
शेवटच्या दिवशी प्रथम सत्रामध्ये
प्राचार्य प्रोफेसर डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांनी “Ethical Consideration in AI” या विषयावर संबोधित केले आणि द्वितीय सत्रामध्ये प्रा. पूनम महाजन यांनी “AI Applications in Business” विषयासंबंधी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी प्राचार्य प्रोफेसर डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांच्या अध्यक्षतेखाली वर्कशॉप चा समारोप करण्यात आला. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जी. आर. वाणी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि ही कार्यशाळा त्यांना त्यांच्या करिअरमध्ये उपयोगी होईल असे नमूद केले. वर्कशॉप साठी विभागातील सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
फोटो कॅप्शन- कार्यशाळेचे उद्घाटन करताना प्राचार्य डॉक्टर बी एच बऱ्हाटे,सोबत उजवीकडून उपप्राचार्य डॉ.जी आर वाणी प्रा.डॉ.गौरी पाटील प्रा. हर्षल पाटील प्रा.स्वाती फलक प्रा.पूनम महाजन आणि इतर शिक्षक वृंद
