भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील नाहाटा कनिष्ठ महाविद्यालयात संकीर्ण समितीतर्फे खुशियों का पासवर्ड व्याख्यान संपन्न झाले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.दीपक पाटील तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ सचिन परब (कॉर्पोरेट ट्रेनर, लाईफ कोच,मेडिकल ॲडव्हायझर,मुंबई),यासोबतच प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यादेवी कन्या विद्यालयातील श्री.नाना पाटील सर उपप्राचार्य प्रा.वाय एम पाटील पर्यवेक्षिका प्रा. स्वाती पाटील संकीर्ण समिती चेअरमन प्रा.नासिर गवळी,प्रा.प्रशांत पाटील उपस्थित होते याप्रसंगी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. सचिन परब यांनी माणसाच्या आयुष्यात ध्यान धारणा किती महत्त्वाची आहे, ध्यान धारणेमुळे माणसाचे आयुष्य कसे बदलू शकते, ध्यान धारणेमुळे आपल्या शरीरात किती बदल होऊ शकतो,यासोबतच एखादा झोपडपट्टी मधील लहान मुलगा किती मोठा सायंटिस्ट बनू शकतोआणि आपल्या आयुष्यात आपण आनंद कसा शोधावा तसेच एखाद्याच्या जीवनात जर बदल घडवायचा असेल तर त्याला एखाद्य पुस्तक जर हातात पडलं तर त्या पुस्तकातून प्रेरणा घेऊन त्याचं संपूर्ण जीवन कसं बदलते, त्यांनी इंग्रजी मधील DOSE या शब्दाची फोड करून असा सकारात्मक DOSE आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात किती गरजेचा आहे आणि त्या डोसचा उपयोग करताना आपण आपल आयुष्य कसं सुजलाम सुफलाम करावं याविषयीचे मार्गदर्शन केले त्यासोबतच दोन मित्रांची कहाणी सांगितली या काहाणीत त्यांनी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्या विषयीचां सारा जीवनपट उलगडला व जीवन जगताना दोघांविषयी प्रेरणा घेऊन कसं जीवन जगावं, आपले जीवन जर यशस्वी करायचे असेल तर पाच विचार हे माणसाने अंगीकारले पाहिजे आणि सर्वात शेवटी रात्र बदलत नसते स्वप्न बदलत असतात मी जिंकणारच मी जिंकणारच या प्रकारचा आशय सांगून उपस्थित विद्यार्थ्यांना अतिशय उद्बोधनपर आणि मार्मिक शब्दात त्यांनी मार्गदर्शन केले आपल्या अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य प्रा.डॉ. दीपक पाटील यांनी विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या व्याख्यानांचा आपलं जीवन जगत असताना उपयोग करून घ्यावा तसेच महाविद्यालयात डॉ.सचिन परब यांनी अशा प्रकारचे मार्गदर्शन केलं त्याविषयी त्यांचं कौतुक केलं आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.हा संपूर्ण कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी एच बऱ्हाटे उपप्राचार्य डॉ.जी आर वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रशांत पाटील तर ऋणनिर्देशन प्रा.नासिर गवळी आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.श्याम दुसाने यांनी केले,कार्यक्रम यशस्वीतेसाठी संकीर्ण समितीच्या प्रा.ललिता राणे प्रा. शारदा सोनवणे प्रा. कांचन राणे यांनी सहकार्य केले.

