भुसावळ (प्रतिनिधी ) –
भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत युवा उद्योजक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा.डॉ.जी आर. वाणी तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक श्री.अश्विनीकुमार परदेशी (मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ ओबेनोल प्रा.लि.व डायरेक्टर ऑफ शेती सेवा टेक्नो सर्विस छत्रपती संभाजीनगर) व वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. ममताबेन पाटील उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी श्री.अश्विन कुमार परदेशी यांचे सहकारी श्री कल्पेश इंगळे, श्री. सचिन पाटील व श्री. प्रेम सागर सिंगतकर, वाणिज्य व्यवस्थापन विभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. अश्विन कुमार परदेशी यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी फक्त डिग्री घेऊन नोकरीसाठी व्यावसायिक संस्थांवर अवलंबून न राहता स्वतः उद्योजकतेकडे वळले पाहिजे व नोकरी मागणारे न होता नोकरी देणारे झाले पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांना उद्योजकाचे स्वप्न बघण्याचे व त्यांना खरे करण्याचे आव्हान केले. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी विद्यार्थ्यांना सद्य अर्थव्यवस्था, उद्योजकता व बेरोजगारी बद्दलची परिस्थिती बाबत अवगत करून देऊन विद्यार्थ्यांना आपले करिअर यशस्वीरित्या कसे घडवता येईल याबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी युवा उद्योजकांसाठी भारत सरकारच्या पंतप्रधान उद्योजकता विकास योजनांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या अर्थसहाय्य देणाऱ्या योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा.डॉ. जी.आर.वाणी यांनी आपल्या मार्गदर्शनात समाजात युवा उद्योजकांचे महत्त्व सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभागप्रमुख प्रा. डॉ. ममताबेन पाटील यांनी केले. यामध्ये त्यांनी महाविद्यालय व वाणिज्य व व्यवस्थापन विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी साठी नियमितपणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एकता बजाज यांनी केले तसेच प्रमुख पाहुण्यांचा परिचय व आभार प्रदर्शन प्रा. पूजा भंडारी यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रा.डॉ. बी. एच. ब-हाटे, उपप्राचार्य प्रा. डॉ. डी. एन. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच वाणिज्य व्यवस्थापन विभागातील प्रा. डॉ. के. पी. पाटील , प्रा.डॉ. रश्मी शर्मा,प्रा.स्मिता बेंडाळे, प्रा.भूषण चौधरी, प्रा. खिलेश पाटील, प्रा. डॉ. सपना जंगले,प्रा.ललिता पाटील, प्रा.स्वाती शेळके प्रा.सोनिया टेकवाणी प्रा. प्रियंका खडसे, प्रा.नंदिनी दायमा, प्रा. वृषाली पाटील व श्री. त्रिविक्रम वारके यांनी परिश्रम घेतले.

