भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक नमा शर्मा यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवस अत्यंत साधेपद्धतीने करून वाढदिवसावर खर्च न करता पुरग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत करून अनोखा व स्तुत्य उपक्रम केल्याने नमा शर्मा यांचे सर्वस्थराकौतुक होत आहे .अतिवृष्टी मुळे हवालदिल शेतकरी, बळीराजाच्या घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी विधिवत शांती यज्ञसुद्धा करण्यात आले.
सविस्तर माहिती अशी कि, I, नमा शर्मा यांच्या मुलाचा वाढदिवस होता.त्यानिमित्ताने भुसावळ तालुक्यातील पुरग्रस्त शेतकरी शांताराम तायडे रा.आचेगाव यांना आर्थिक मदत देऊन सामाजिक दायित्व निभावण्याचे कार्य त्यांनी केले आहे.शिवसेना प्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणुकी नुसार ऐंशी टक्के समाज कारण व वीस टक्के राज कारण असा विचार त्यांनी अंमलात आणला आहे. राज्यात शेतकरी बंधुंवर मोठेच नैसर्गिक संकट आले आहे.आपल्या तालूक्यातील शेतकरी बांधवांना योग्य ते सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम येथील परशूराम मंदिरात झाला.याप्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी ललित मुथा, उपजिल्हा प्रसिद्धी प्रमुख व मा नगरसेवक दिलीप सुरवाडे,शहर प्रमुख गणेश चौधरी (सोनवणे ) ,आदी मान्यवर उपस्थित होते.

