भुसावळ (प्रतिनिधी ) – ब्राह्मण संघ भुसावळ मध्ये 100 वर्षांचा वारसा असलेल्या श्री महालक्ष्मी मातेचा शारदीय नवरात्र उत्सवातील अष्टमीला “घागरी फुंकणे ” हा कार्यक्रम विधिवतरित्या संपन्न झाला. सकाळी श्री विधवांस गुरुजींनी मंत्रौपचारे नवविवाहित महिलांचे हस्ते पूजन केली. सायंकाळी प्रथेप्रमाणे तांदळाच्या पिठाची उकड करून त्या द्वारे श्री महालक्ष्मी मातेचा मुखवटा मूर्तिकार रमाकांत भालेराव यांनी तयार करून दिल्यावर विधिवत पूजा, आरती करण्यात आली.


सर्वप्रथम सौ. प्रचिती कुळकर्णी यांच्या विद्यार्थिनींनी नृत्यकला सेवा महालक्ष्मीमातेच्या चरणी अर्पण केली. रात्री 8 ते 12 वाजेपर्यंत जागरण समयी भुसावळ मधील सांस्कृतिक कला निकेतनतर्फे स्वरअभंग या कार्यकमच्या माध्यमातून भक्तीगिते व अभंग सादर करण्यात आले. याचे सूत्रसंचलन पंकज जोशी यांनी केले. या कार्यक्रमासाठी मुकेश खपली, मधुकर गोडबोले व महेंद्र गोडबोले यांनी सहकार्य केले. त्यानंतर योगेश साळशिंगीकर व समूह यांनी देवीची भक्तीगीते सादर केली.

कार्यक्रम यशस्वितेसाठी
सौ. कल्याणी ओक, सौ रश्मी केळकर सौ अनघा फडके, सौ. वनिता फडके, श्रीमती कल्पना दामले, सौ वैशाली एकलारकर, मंगलाताई, अशोक भाऊ यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे नियोजन महेंद्र गोडबोले, आनंद फडके, आनंद केळकर, अमोद टेम्भूर्णीकर, प्रसन्न गंधे, संजय बोचरे, शंतनू गचके, जयंत जोशी, पंकज जोशी आणि समस्त कार्यकारिणी यांनी केले.

