पुनम विजय फालक यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान;

भुसावळ(प्रतिनिधी ) – येथील ताप्ती पब्लिक स्कूलच्या उपशिक्षिका तसेच समाजसेवी ,विद्यार्थीप्रिय शिक्षिका सौ. पुनम विजय फालक यांना राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रवादी कांग्रेस अध्यक्ष रविंद्रभैया पाटील,पाचोरा बाजार समीती चे संचालक शालीग्राम मानकर,संस्थाअध्यक्षा संदिपा वाघ, सिंगल वुमन फौंडेशन अध्यक्ष मनिषा चव्हाण,सामाजीक कार्यकर्त्या मनिषा पाटील यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 हा प्रदान करण्यात आला .

गेल्या तेरा वर्षापासून त्या ताप्ती पब्लिक स्कूल येथे कार्यरत असून अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडवले आहे .आज त्यांनी घडवलेले विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत असून, काही वर्षांपूर्वी या विद्यार्थीप्रिय शिक्षीकेला पालकांच्या व विद्यार्थी यांच्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्कार हा ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये प्रदान करण्यात आला होता. अनेक विद्यार्थीपयोगी व विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारे कार्यक्रम ते राबवित असून अनेक सामाजिक उपक्रमात सुद्धा त्या हिरहिरीने भाग घेतात. त्याचप्रमाणे आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सुद्धा त्या आघाडीवर आहेत, तसेच अनेक धार्मिक कार्यात सुद्धा त्या सहभाग घेतात. आज सुद्धा त्यांचे अनेक विद्यार्थी आवर्जून शिक्षक दिनाच्या दिवशी त्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतात .अत्यंत प्रतीकुल परिस्थीतीत त्यांनी आपले शिक्षण पुर्ण केले असुन संसाररुपी भवसागरात त्यांनी अत्यंत कष्ट सहन केले आहे.त्यांनी नुकतीच जैन साध्वीकडुन परीवारासहीत मांसाहार त्यागाची प्रतीज्ञा घेवुन जिवदया चे महान कार्य केले. अशा या ज्ञानयोगी शिक्षिकेला हा पुरस्कार देताना राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेला अभिमान वाटत असल्याचे या संस्थेचे प्रमुख सौ. संदीपा वाघ व ज्ञानेश्वर वाघ यांनी आवर्जून सांगितले. पुरस्कार प्रदान प्रसंगी अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल व केलेल्या कार्याची दखल घेतल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मोहनभाऊ फालक, चेअरमन महेश फालक, सेक्रेटरी विष्णूभाऊ चौधरी, कोषाध्यक्ष संजयजी नाहाटा,सर्व पदाधिकारी व ताप्ती पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका निना कटलर ऊपमुख्याध्यापीका मनप्रीत कौर,श्रध्दाली घुले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ च्या चेअरमन कांचन नेमाडे,जगन्नाथ नेमाडे, तसेच ,जयलक्ष्मी अँकॅडमीचे जय व लावण्या फालक तसेच अनेक मान्यवर,नातेवाईक व मित्र परिवारातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.