जळगावात हरिजन कन्या छात्रालयात कन्या पूजन

जळगाव (प्रतिनिधी ) – नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था व रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या तर्फ हरिजन कन्या छात्रालयात कुमारी पूजन हा कार्यक्रम घेण्यात आला नवरात्रीत अतिशय महत्वाची आणि पवित्र अशी हि परंपरा असुन लहान मुलीन मध्ये देवीचे रुप माणुन हि पुजा केली जाते कन्यापुजन करतांना त्यांना आसनावर बसुन त्यांचे पाय धुऊन स्वच्छ पुसुन त्यांच्या कपाळी तिलक लावुन फुले टाकुन पुजा केली व त्यांना भेटवस्तु व फळे देण्यात आली या वेळी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्षा मनिषा पाटील, ॲड सिमा जाधव,वंदना मंडावरे, आशा मौर्य, विदया जकातदार हर्षा गुजराथी नेहा जगताप तेजल वनरा प्रतिभा सोनवणे जानवी जगताप क्रीडा शिक्षक प्रविण पाटील डॉ गणेश पाटील व विद्यार्थिनी उपस्थित होत्या