नागपूर हादरले ! झुंड’ चित्रपटातील बाबू छत्रीची हत्या; मित्राला अटक

नागपूर : नागराज मंजुळे दिग्दर्शित हिंदी चित्रपट झुंड मधील कलाकार प्रियांशू क्षत्रिय उर्फ बाबू छत्री याची नागपूरमधील जरीपटका भागात हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चित्रपटात प्रियांशूने बाबू छत्री ही भूमिका साकारली होती.

माहितीनुसार, प्रियांशूचा मित्र ध्रुव साहू याने दारुच्या नशेत झालेल्या वादातून त्याचा खून केला. या हल्ल्यात ध्रुव साहूने प्रियांशूवर धारदार शस्त्राने वार करून त्याला जखमी केले. प्रियांशूला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेनंतर पोलिसांनी ध्रुव साहू याला अटक केली आहे. यावेळी समोर आले की, प्रियांशू क्षत्रिय याच्यावर यापूर्वीही काही गुन्हे दाखल झाले होते. झुंड चित्रपटात त्याला काम मिळाल्याने अनेकांनी त्याबाबत आश्चर्य व्यक्त केले होते.