भुसावळ (प्रतिनिधी) : दिवाळीच्या काळात रेल्वे गाड्यांनी प्रवास करणाऱयांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. नागपूर, मुंबई, पुणे, अमदाबाद, खंडवा भागातून भुसावळ मार्गावर जाणार्या रेल्वे गाड्यांना नोरूम दिसत असल्याने प्रवाशांना आता तत्काळ तिकीटाचाच आधार घ्यावा लागणार आहे अथवा खाजगी वाहतुकीचा पर्याय त्यांच्याकडे असणार आहे.

दिवाळीत बुकींग गाड्यांचे फुल्ल
दिवाळीच्या काळात बुधवार, 15 ऑक्टोंबरपासून पुणे, मुंबई, नागपूर, अमदाबादकडून भुसावळकडे येत असलेल्या प्रवाशी एक्स्प्रेस या गाड्या प्रवाशांनी फुल्ल झाल्या आहे. यामुळे ऑनलाईन अथवा रेल्वे स्थानकावर तिकीट काढण्यास गेलेल्या प्रवाशांना नोरूम असल्याने तिकीट मिळत नाही. यामुळे प्रवाशांना आता तात्काळ तिकीट हाच एकमेव पर्याय समोर आहे. यामुळे प्रवासी आता तात्काळ तिकीट काढण्याचे नियोजन केले आहे.
या गाड्यांना ‘नो रूम’
‘नो रूम’ असलेल्या रेल्वे गाड्यांमध्ये पुण्याकडून येणार्या रेल्वे गाड्यामध्ये पुणे-नागपूर वंदे भारत, गोवा एक्स्प्रेस, पुणे-अमरावती हुतात्मा एक्स्प्रेस, झेलम एक्स्प्रेस, गरीब रथ एक्स्प्रेस, आझाद हिंद एक्स्प्रेस, पुणे-दानापूर एक्स्प्रेस, पुणे नागपूर हमसफर एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस तसेच मुंबईकडून भुसावळकडे येणार्या गीतांजली एक्स्प्रेस, कामायनी एक्स्प्रेस, गोदान एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस, विदर्भ एक्स्प्रेस, हावडा मेल, पठाणकोट एक्स्प्रेस, शालिमार एक्स्प्रेस, पाटलीपुत्र, महानगरी, कुशीनगर एक्स्प्रेस आदी गाड्यांना नोरूम आहे.
अहमदाबादकडून येणार्या रेल्वे गाड्यांमध्ये ताप्ती गंगा एक्स्प्रेस, अहमदाबाद हावडा एक्स्प्रेस, नवजीवन एक्स्प्रेस, सुरत भुसावळ एक्स्प्रेस, अमदाबाद पुरी एक्स्प्रेस, अहमदाबाद बैरोनी एक्स्प्रेस, सुरत अमरावती एक्स्प्रेस तसेच दिल्लीकडे जाणार्या रेल्वे गाड्या सुध्दा फुल्ल झाल्या आहेत. यात कर्नाटक एक्स्प्रेस, सचखंड एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस, मंगला एक्स्प्रेस या गाड्यांना नो रूम दर्शवण्यात आले आहे.
