जीएसटी दर घटल्याची बाब ग्राहकांच्या पथ्यावर -भुसावळात भाजपच्या व्यापारी संमेलनातील सूर : आत्मनिर्भर भारतावर विचारमंथन ;

भुसावळ (प्रतिनिधीं) – केंद्र शासनाने जीएसटीचे दर कमी केल्याने ग्राहकांची खरेदी वाढून व्यापारी व ग्राहकांचे हित जोपासले गेल्याचा सूर शहरातील भाजपाच्या व्यापारी संमेलनात व्यक्त झाला. भारतीय जनता Universal व्यापारी आघाडीतर्फे सोमवारी श्री लक्ष्मी व्यकंटेश देवस्थान परिसरात सायंकाळी आत्मनिर्भर भारत, जीएसटी, नेक्स्ट जनरेशन दोन या विषयावर व्यापारी संमेलन झाले. राधेश्याम लाहोटी, अशोक नागराणी यांनी जीएसटीबद्दल मार्गदर्शन केले

विचार मंचावर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, भाजपचे जळगाव जिल्हा पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जिल्हा सरचिटणीस परीक्षित बहर्‍हाटे, वक्ते प्रा.डॉ.निखिल वायकोळे, डॉ.केतकी पाटील, व्यापारी निर्मल कोठारी, उद्योजक मनोज बियाणी, युवराज लोणारी, सी.ए.प्रा.दिनेश राठी आदी उपस्थित होते. प्रा.डॉ.निखील वायकोळे यांनी मार्गदर्शन केले.

जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर व मंत्री संजय सावकारे यांनी सरकारच्या ध्येय, धोरणांविषयी माहिती दिली. दुकानात, व्यवसायाच्या ठिकाणी जीएसटी, स्वदेशी वस्तूंची मा दर्शनी भागात लावावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. भाजपा उत्तर विभागाचे अध्यक्ष सुरवाडे, दक्षिण भागाचे शहराध्यक्ष किरण कोलते व पदाधिकारी उपस्थित होते.