भुसावळ, (प्रतिनिधी) – भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज, बुधवारी (दि. ८) सकाळी १० वाजता प्रांताधिकारी कार्यालयातील तापी सभागृहात प्रभागनिहाय महिला आरक्षणाची सोडत पार पडली. यापूर्वी सोमवारी नगराध्यक्षपदाची सोडत काढण्यात आली होती, ज्यामध्ये नगराध्यक्षपद अनुसूचित जातीतील महिलेसाठी राखीव झाले आहे.

आजच्या सोडतीत प्रभागनिहाय अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला जागांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. या सोडतीनंतर उद्या, गुरुवारी (दि. ९) आरक्षणाची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. आरक्षणावर हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी ९ ते १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. नागरिकांना आपल्या हरकती मुख्याधिकाऱ्यांकडे किंवा संबंधित प्रभाग कार्यालयाच्या मुख्यालयात सादर करता येतील. यानंतर हरकतींवर सुनावणी घेण्यात येईल.
नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण गटाचे आरक्षण अपेक्षित असताना अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ही सोडत निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरली असून, येत्या काळात निवडणुकीची प्रक्रिया अधिक गतिमान होईल, अशी अपेक्षा आहे.
यावेळी उपस्थित


