हुडको परिसरात एका घरावर गॅस सिलिंडर व रिफलिंगवर कारवाई ; गुन्हा दाखल! –

जळगाव (प्रतिनिधी ) – गॅस सिलिंडर व रिफलिंग साहित्य असलेल्या घरावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करीत सिलिंडर व साहित्य जप्त केले. ही कारवाई सोमवार ६ रोजी पिंप्राळा हुडको परिसरात करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर असे की, शेख अरबाज शेख अब्बास (२७, रा. पिंप्राळा हुडको) याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंप्राळा हुडको परिसरातील एका घरामध्ये अवैध गॅस रिफलिंग सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली. त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने एक सिलिंडर, मोटार, वजनकाटा, गॅस भरण्याची नळी असे एकूण २४ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी पोहेकॉ. प्रवीण भालेराव यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शेख अरबाज शेख अब्बास याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि. सचिन रणशेतरे करीत आहेत.