USO वारकरी संघटनेच्या जळगाव जिल्हाअध्यक्षपदी नाहाटा महाविद्यालयातील प्रा.भूपेंद्र बाणाईत

भुसावळ (प्रतिनिधी ) – जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमन मंदिर या ठिकाणी म्हणजेच देहुगाव पुणे येथे USO वारकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प.श्री.माणिक महाराज मोरे हे होते या कार्यशाळेत अनेक वक्त्यांनी वारकरी संप्रदाय बद्दलचे आपले मत मोठ्या उत्साहात व्यक्त केले तसेच USO वारकरी म्हणजे काय USO वारकरी संघटनेची तत्वे,मूल्य आणि प्रवास या संदर्भात USO वारकरी संघटना ज्यांच्या विचारातून पुढे आले असे ह.भ.प श्री अनिकेत महाराज मोरे यांनी सविस्तर माहिती दिली संपूर्ण महाराष्ट्र भरातील वारकरी संप्रदाय एक झाला पाहिजे त्याच प्रमाणे वारकरी संप्रदायाला जागतिक गत वैभव प्राप्त करून देण्याच्या महत्त्वपूर्ण उद्देशाने आपण सर्वांनी काम केले पाहिजे असे प्रतिपादन श्री अनिकेत महाराज यांनी केले. तसेच महाराष्ट्रात USO वारकरी व्यापक रचनेच्या दृष्टिकोनातून जळगाव जिल्ह्याची जबाबदारी जिल्हा प्रमुख म्हणून. फेकरी भुसावळ येथील प्रा.श्री भूपेंद्र बाणाईत यांच्यावर देण्यात आली

श्री जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचे 11 वे वंशज ह.भ.प.गुरुवर्य श्रीअनिकेत महाराज मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यांच्या या निवडीबद्दल ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक,चेअरमन महेश फालक, सेक्रेटरी विष्णू चौधरी,कोषाध्यक्ष संजयकुमारजी नाहाटा सर्व सन्माननीय संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी एच बऱ्हाटे,उपप्राचार्य प्रा.डॉ.दीपक पाटील उपप्राचार्य प्रा.डॉ.जी आर वाणी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.वाय.एम.पाटील,प्रा. प्रशांत पाटील तसेच सर्व प्राध्यापक बंधू भगिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे तर या कार्यक्रमात भुसावळ येथील प्रा. श्री कौस्तुभ पाटील, श्री.दृश्यन नायदे ,श्री कार्तिक जगताप यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.