दिवाळीनंतर दोन दिवसांत आचारसंहिता लागू होण्याची शक्यता; नगराध्यक्षपद आरक्षण जाहीर

जळगाव : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता दारात उभ्या आहेत. दिवाळीनंतर अवघ्या दोन दिवसांत आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याचे संकेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांकडून निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, “लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपेक्षा ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महापालिका या निवडणुका म्हणजेच खऱ्या अर्थाने नेत्याची कसोटी असते. लोकशाहीतील सर्वात महत्त्वाच्या या निवडणुका असून लवकरच जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणाही होणार आहे.”

दरम्यान, राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा आज करण्यात आली. महाराष्ट्रातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींमध्ये आरक्षण निश्चित करण्यात आले असून, ३३ नगरपरिषदांपैकी १६ नगरपरिषदांमध्ये अनुसूचित जातीतील महिलांना आरक्षण देण्यात आले आहे.

आरक्षण जाहीर झालेल्या प्रमुख नगरपरिषदांमध्ये खालील नगरपरिषदांचा समावेश आहे . मोहोळ
ओझर
भुसावळ , सावदा
शिर्डी
दिग्रस
अकलूज
बीड
(इतर नगरपरिषदांसह एकूण १६)

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आचारसंहिता लागू होताच निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार असून, राजकीय हालचालींनाही आता वेग आला आहे.