एरंडोल येथील पूरग्रस्तांना सामाजिक संस्थाचा मदतीचा हात !नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव , व रोटरी क्लब एरंडोल कडून मदत !


एरंडोल (प्रतिनिधी ) – येथे अंजनी नदीला आलेल्या महापुरामुळे म्हसावद नाक्याजवळील कुंभार वाडा व फकीरवाड्यातील काही कुटुंबियांची मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली होती . अचानक घरात पाणी शिरल्यामुळे ह्या गरीब कुटुंबीयांचे प्रचंड नुकसान झाले होते . काही नागरिकांचे व्यावसायिक नुकसान हि मोठ्या प्रमाणात झाले होते .
अश्या भीषण परिस्थितीत जळगाव येथील नारी शक्ती बहुउद्देशीय संस्था व रोटरी क्लब एरंडोल ह्या सामाजिक संस्थानी जीवनावश्यक वस्तूंचे किट ज्यामध्ये धान्य , डाळ , तेल , ह्याबरोबरच ब्लॅंकेट ह्यांचे घरपोच वाटप ह्या परिसरातील पूरग्रस्त नागरीक ह्यांना करण्यात आले . त्याचबरोबर ह्या पूरग्रस्त नागरिकांना मानसिक आधार देण्याचे हि कार्य ह्या संस्थानी ह्या प्रसंगी केले .
शासकीय यंत्रणेची मदत पोहोचण्याचा अगोदरच ह्या सामाजिक संस्थेनी संवेदनशीलता जपवत केलेले ही धडपडीचे पूरग्रस्त नागरिकांनी स्वागत करत ह्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले .
ह्या प्रसंगी जळगाव येथील नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष
सौ मनीषा पाटील, वंदना मंडावरे, नूतन तासखेडकर,किमया पाटील, हर्षा गुजराती ,विभावरी पाटील आणि रोटरी क्लब एरंडोल चे चार्टर अध्यक्ष , माजी नगरसेवक डॉ . नरेंद्र ठाकूर ह्यांनी ह्या मदतीचे वाटप केले .
ह्या ठिकाणी श्री . राजेंद्र चोधरी , श्री . देवा चोधरी , श्री . विक्की चोधरी , श्री . पवन चोधरी ,श्री . मुश्ताक खाटीक श्रीमती ज्योती राणे ,नीता वानखेडकर ,एडवोकेट सीमा जाधव, नेहा जगताप आशा मौर्य, माधुरी टोके ,माधुरी शिंपी व सर्व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकारी व कुंभारवाडा मित्र मंडळांच्या पदाधिकारी ह्यांचे विशेष सहकार्य लाभले .
जळगाव जिल्ह्याचे संवेदनशील जिल्हाधिकारी मान . आयुष् प्रसाद ( आय . ए.एस ) ह्यांनी एरंडोल येथील ह्या पूरग्रस्त भागाला भेट दिल्यावर ज्या निराधार वृद्ध आजीशी संवाद साधून तिच्या ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजने संदर्भात जी सकारात्मक कार्यवाही केली होती त्या वृद्ध आजीची हि नारी शक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या सदस्यांनी भेट घेऊन आपुलकीने चोकशी करून तिला हि मदतीचा हात दिला व पुढील काळात हि जी काही मदत लागेल ती करण्याचे आश्वासन देऊन धीर देण्याचा प्रयत्न केला .

फोटो ओळी – एरंडोल येथील पूरग्रस्त वृद्ध नागरिकाला मदतीचा हात देतांना नारी शक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव च्या पदाधिकारी मनीषा पाटील , वंदना मंडावरे व रोटरी क्लब एरंडोल चे डॉ नरेंद्र ठाकूर , राजेंद्र चोधरी व इतर