बोदवड महाविद्यालयामध्ये वैद्यकीय तपासणी शिबिर संपन्न ;


बोदवड ( प्रतिनिधी) – येथील बोदवड एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये विद्यार्थी विकास कक्षाद्वारे प्रथम वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान तसेच प्रथम वर्ष पद्युत्तर कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी दिनांक 7 ऑक्टोबर रोजी संपन्न झाली. प्रसंगी निरामय सुपर स्पेशालिटी होमिओपॅथी क्लिनिक बोदवड येथून डॉ. प्रशांत बडगुजर आणि तुलसी हॉस्पिटल बोदवड येथून डॉ. राजेंद्र कोळंबे उपस्थित होते.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रथम वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान आणि पद्यूत्तर प्रथम वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान प्रवेशित विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असते. यामध्ये विद्यार्थ्यांच्या आजारांची कौटुंबिक पार्श्वभूमी लक्षात घेतली जाते. त्यात हृदय व रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था, त्वचा, पोट, लघवी, नाक, कान, घसा, डोळे, दात, मासिक पाळी, लिंग, इत्यादी तपासण्या करून डॉ. प्रशांत बडगुजर आणि डॉ. राजेंद्र कोळंबे यांनी विद्यार्थ्यांच्या विविध आजारांशी संबंधित सर्व शंकांचे निरसन केले आणि उपाय देखील सुचविलेत. प्रसंगी विद्यार्थी व विद्यार्थिनींमध्ये पोषण आहार, केस गळती आणि काही प्रमाणात त्वचा संदर्भातील तक्रारी दिसून आल्यात असे डॉ. प्रशांत बडगुजर यांनी सांगितले. वैद्यकीय शिबिरामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वैद्यकीय तपासणी शिबिर सुरळीत पार पाडण्यासाठी माननीय प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अजय पाटील यांनी प्रास्ताविक केले तर विद्यार्थी विकास महिला अधिकारी डॉ. रूपाली तायडे यांनी आभार प्रदर्शन केले. शिबिर यशस्वीतेसाठी प्रा. अजित पाटील, जितेंद्र बडगुजर, सुभाष भाई, अतुल पाटील, विद्यार्थी व विद्यार्थिनींनी प्रयत्न केलेत.